दोडामार्ग : पावसाळ्यात दोडामार्ग तालुक्यात वीज समस्या जाणवत असल्या कारणाने ९ मे रोजी दोडामार्ग तालुक्यात विविध समस्या पावसाळापूर्वी सोडविण्यासाठी महा मॅरेथॉन बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
पावसाळा जवळ आला की दोडामार्ग तालुक्यातील वीज समस्या ही गंभीर रुपधारण करते. पावसाळ्यात दोडामार्ग तालुका अनेक दिवस हा काळोखात राहत आहे. गेले कित्येक दिवस पावसाळ्यातील वीज समस्या ही दोडामार्ग तालुक्याला डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यात महा मॅरेथॉन बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक ९ मे रोजी सकाळी १०.३० वाजता मांगेली-देऊळवाडी श्री सातेरी देवी मंदिर सभागृह, दुपारी १२.३० वाजता शांतादुर्गा मंदिर खोक्रल, दुपारी ३ वाजता झरे-२ ग्रामपंचायत कार्यालय, दुपारी ४ वाजता पिंपळेश्वर हॉल दोडामार्ग शहर, संध्याकाळी ५ वाजता सासोली ग्रामपंचायत हॉल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर बैठकांना अधिक्षक अभियंता सिंधुदुर्ग श्री.वनमारे, वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दोडामार्ग तालुक्यातील वीज ग्राहकांनी वीज समस्या २ प्रति लेखी स्वरूपात, समस्यांच्या पुराव्यासह सदर ठिकाणचे फोटो किंवा आपण यापूर्वी दिलेले निवेदन आणायचे आहे. मोठ्या संख्येने सदर बैठकांना वीज ग्राहकांनी उपस्थित रहावे असे आवाहन वीज ग्राहक संघटना दोडामार्ग, अध्यक्ष व्यापारी संघटना, सरपंच संघटना, सर्व राजकीय पक्ष तालुकाध्यक्ष, दोडामार्ग नगराध्यक्ष यांनी आवाहन केले आहे.
पावसाळ्यापूर्वी वीज समस्या निराकरणासाठी ९ मे रोजी दोडामार्ग तालुक्यात मॅरेथॉन बैठकांचे आयोजन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


