Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

खोलीतून फक्त किंचाळण्याचा आवाज आला.! ; एक अशी घटना पोलीसही थरथरले.

चेन्नई : एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. खरे तर, हे प्रकरण तमिळनाडूच्या होसूरमधील जूजुवाडी भागातील आहे. जिथे जिम ट्रेनर भास्कर आणि त्याची पत्नी आपला खाजगी वेळ एन्जॉय करत होते. पोलिसांना दिलेल्या जबाबात भास्करने दावा केला की त्याने आणि त्याच्या पत्नी शशिकलाने दारू प्याली होती. त्यानंतर परस्पर संमतीने ‘बॉन्डेज इंटरकोर्स’ केले. भास्करने सांगितले की त्याने शशिकलाचे हात-पाय बांधले आणि गळ्याभोवती कापड गुंडाळले. यादरम्यान शशिकलाच्या नाकातून रक्त वाहू लागले. जेव्हा त्याला रक्तस्त्राव दिसला, तेव्हा तो तिला तातडीने रुग्णालयात घेऊन गेला. तेथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी शशिकलाला मृत घोषित केले. भास्करने सांगितले की ‘सेक्स करताना त्याच्या पत्नीचा मृत्यू’ झाला. पण कहाणी इथेच संपत नाही.

‘त्याने तिचे तोंड, हात-पाय बांधले आणि तिला मारले’

शशिकलाचे वडील अरुल यांनी भास्करची कहाणी खोटी ठरवली. त्यांचे म्हणणे आहे की भास्कर बराच काळ शशिकलाला शारीरिक त्रास देत होता. त्यांनी सांगितले की, ‘आम्ही दोनदा शशिकलाला रुग्णालयात दाखल केले होते, जेव्हा भास्करने तिला मारले होते. त्याने माझ्या मुलीचे हात-पाय बांधले, तोंडात कापड कोंबले आणि तिला मारले. मग मला फोन करून सांगितले की शशिकला मरण पावली आहे. सुरुवातीला वाटले तो मस्करी करत आहे, पण नंतर सत्य समोर आले.

प्रेमविवाह, मग तुटले नाते –

सांगण्यात येते की, भास्कर आणि शशिकला यांनी 2018 मध्ये प्रेमविवाह केला होता. पण लग्नानंतर काही काळातच दोघांमध्ये भांडणे वाढू लागली. शशिकला 30 वर्षांची होती आणि ती दोन मुलांची आई होती. ती होसूरमध्ये महिलांसाठी जिम चालवत होती. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, भास्करने लग्नात 14 लाख रुपये हुंडा घेतला होता. तपासादरम्यान पोलिसांना असेही आढळले की भास्करचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. याच मुद्द्यावरून पती-पत्नीमध्ये बराच काळ वाद सुरू होता. घटनेच्या दिवशीही भास्करचे पत्नीसोबत भांडण झाले. त्यानंतर जिम ट्रेनरने पत्नीचा कापडाने गळा घोटून खून केला. पण स्वतःला वाचवण्यासाठी त्याने पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला की त्याच्या पत्नीचा मृत्यू सेक्सदरम्यान अचानक झाला. आता पोलिसांनी भास्करला अटक केली आहे आणि प्रकरणाचा तपास करत आहेत. फॉरेन्सिक अहवाल आणि वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे, जेणेकरून मृत्यू अपघाताने झाला की खून झाला हे स्पष्ट होईल.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles