Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत भोसले इंटरनॅशनल स्कूलचा डंका.!

सावंतवाडी : जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या १४ वर्षाखालील मुलांच्या गटातून आठवीतील मंथन सावंतभोसले व अब्दुल रहमान यांनी विजय मिळवत विभागीय फेरीसाठी आपले स्थान पक्के केले. तसेच १९ वर्षाखालील मुलांच्या गटातून दहावीतील दीप गावडे, शारिक बांदेकर व सेल्टन रॉड्रिक्स यांची विजय मिळवत विभागीय फेरीत प्रवेश मिळवला.

सदर स्पर्धा मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आयोजित करण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक सचिन हरमलकर व एस्टर परेरा यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या विद्यार्थ्यांचे शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व मुख्याध्यापिका प्रियंका देसाई यांनी अभिनंदन केले व पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles