कुडाळ : उद्या गुरुवार दिनांक 8 मे 2025 रोजी दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वर आरोही (बदलापूर) प्रस्तुत जुन्या नव्या भक्ती गीतांचा सदाबहार नजराणा घेऊन ‘भक्तीरंग’ हा संगीतमय कार्यक्रम सुर नवा ध्यास नवा फेम आरोही रोहित प्रभूदेसाई सादर करणार आहेत. यावेळी तिच्यासोबत सारंगी रोहित प्रभूदेसाई सुद्धा आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.
यावेळी सुप्रसिद्ध गायिका मेघा रोहित प्रभूदेसाई या हार्मोनियमवर साथसंगत करणार असून तबलाची साथसंगत तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांचे शिष्य रोहित गजानन प्रभूदेसाई हे करणार आहेत.
या बहारदार कार्यक्रमाचे निवेदन संजय कात्रे करणार असून ध्वनीची जबाबदारी हेमंत मेस्त्री सांभाळणार आहेत. विशेष सहकार्य श्री दत्त मंदिर समिती व श्री रवी सातवळेकर परिवार कोलगाव यांचे असून श्री दत्त मंदिर माणगाव येथे हा बहारदार कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


