Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

गडकरींनी देशातील अनेक रस्ते केले, पण खराब रस्ते कोकणातले, मला ट्रेनने यावे लागले.! ; रामदास आठवलेंचा सरकारला घरचा आहेर.

खेद : मुंबई – गोवा महामार्गाच्या अवस्थेवरुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील अनेक रस्ते केले, पण कोकणातील रस्ते अजूनही खराब आहेत. मी रस्त्याने येणार होतो,मात्र रस्ता खराब असल्यामुळे मला ट्रेनने यावे लागले असल्याचे  मत आठवले यांनी व्यक्त केलंय. खेडमधील नागरी सत्कार कार्यक्रम दरम्यान रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केलंय. यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमही उपस्थित होते.

मध्ये एकत्र आलेले आहेत, दोन रामदास भाई …मग करु नका तुम्ही जाण्याची घाई.!

” खेडमध्ये एकत्र आलेले आहेत, दोन रामदास भाई …मग करु नका तुम्ही जाण्याची घाई..तुमच्या सर्वांची आहे आरपीआय …जशी असते दुधावरची साय..” अशी कविताही रामदास आठवले यांनी म्हटली. पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले, कोकणातील तीन जिल्ह्यातून आपण आज एकत्र आलो आहोत. योगेश भाई उभं करत आहेत, विकासाचं शेड, म्हणूनच मी झालो आहे, आरपीआयचा हेड, असंही आठवले म्हणाले.

मी रस्त्याने येणार होतो,मात्र रस्ता खराब असल्यामुळे मला ट्रेनने यावे लागले.मुंबई – गोवा महामार्ग हा कोकणातून जाणारा महत्वाचा रस्ता आहे. पर्यटन विकासासाठी हा रस्ता लवकरात लवकर होणे गरजेचे. महाराष्ट्राचा विकास होताना कोकणाकडे दुर्लक्ष व्हायला नको. बेदखल कुळासह शेड्युल कास्ट आणि इतर प्रश्न अजूनही  आहेत, असंही रामदास आठवले यांनी नमूद केलं.

”वेळ आली तर देईल मी जान, पण बदलू देणार नाही बाबासाहेबाचं संविधान.!”

पुढे बोलताना रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले, आजचा मेळावा रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केला होता. देशातील सर्व जाती धर्मांना एकत्र करण्याचं प्रयत्न केला. अन्याय सहन करत असताना आंबेडकरांसारखा माणूस देशासाठी लढत होता. देशातील विषमता नष्ट करण्यासाठी ते रात्र रात्र जागले. आज वेळे प्रमाणे आदर्श बदलले. पँथरचं संघटन मला रिपब्लिकन पक्षासाठी बरखास्त करावं लागलं. “वेळ आली तर देईल मी जान, पण बदलू देणार नाही बाबासाहेबाचं संविधान…!” अशी घोषणाही आठवले यांनी केली.   

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles