Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेप्रकरणी संशयित आरोपी मयूर कासलेची निर्दोष मुक्तता ! ; ॲड. प्राजक्ता शिंदे, ॲड. कौस्तुभ मर्गज यांचा यशस्वी युक्तिवाद !.

कणकवली : अल्पवयीन मुलीला पळवून नेवून तिच्यावर अत्याचार केलेप्रकरणी मयूर सखाराम कासले (शिरवल-कणकवली) याची मे. विशेष सत्र न्यायाधीश ओरोस श्रीम. व्ही. एस. देशमुख यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने ॲड. प्राजक्ता शिंदे, ॲड.कौस्तुभ मर्गज यांनी काम पाहिले.

याबाबतची सविस्तर हकीकत अशी की २९ एप्रिल २३ रोजी पिडीत अल्पवयीन मुलगी ही तिचे कॉलेजला जाण्याकरिता नेहमीप्रमाणे घरातून निघून गेली. त्यानंतर पिडीत अल्पवयीन मुलगी ही नेहमीच्या वेळेत घरी परत न आल्याने तिचे नातेवाईक यांनी तिचा शोध घेतला असता ती मिळून आलेली नाही. त्यामुळे तिचे अज्ञानाचा फायदा घेवून तिला कोणीतरी अज्ञात इसमाने कायदेशीर रखवालीतून फूस लावून पळवून नेले अशी फिर्यादी पोलिस स्टेशन मध्ये देण्यात आली.त्यानुसार
कणकवली पोलीस स्टेशन गुन्हा भा.द.वि.कलम ३६३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर ३० एप्रिल २३ रोजी अल्पवयीन मुलगी स्वतःहून घरी आल्यानंतर फिर्यादी यांनी तिला १मे २३ रोजी कणकवली पोलीस ठाणे येथे हजर केले असता पोलीसांनी तिचा जबाब नोंदविला.त्यानुसार नमूद गुन्ह्यामध्ये भा.द.वि.कलम ३७६, ३७६ (२)(j), सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,८,१२ प्रमाणे कलम समाविष्ट करण्यात आले आहे. पिडीतेने दिलेल्या जबाबानुसार दिनांक २९ मे २३ रोजी मयूर सखाराम कासले हा गुन्ह्यातील आरोपी अल्पवयीन मुलीला कणकवली एस.टी.स्टॅड वरून मालवण येथे फिरण्याकरिता घेवून गेला. तसेच त्यापूर्वी कासले याने तिला देवगड येथे फिरायला जावूया असे सांगून देवगड येथे फिरायला घेवून गेला. तेथे देवगड पवनचक्की येथे फिरून झाल्यावर कासले याने आपण फ्रेश व्हायला लॉजवर जावूया असे सांगून अल्पवयीन मुलीला देवगड एस.टी.स्टॅड येथील एका लॉजवर नेले आणि ती नको नको बोलत असताना देखील आरोपी याने तिला जवळ घेवून जबरदस्तीने शारीरिक संबध केले.तपासाअंती आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र विशेष सत्र न्यायालय ओरोस येथे पाठविण्यात आले होते. सदर केसची सुनावणी मे.विशेष सत्र न्यायालय ओरोस यांचे समोर पूर्ण झाली. पुराव्याअंती मयूर कासले याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीच्या वतीने अँड.प्राजक्ता शिंदे, अँड.कौस्तुभ मर्गज यांनी काम पाहिले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles