पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. तर यंदाच्या वर्षी राज्यात 285 विद्यार्थ्यांना 35% टक्के मिळाले आहेत.
285 विद्यार्थ्यांना 35% टक्के –
राज्यात 35 टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं झालं तर, पुणे – ५९ विद्यार्थी, नागपूर – ६३ विद्यार्थी, छत्रपती संभाजी नगर – २८ विद्यार्थी, मुंबई – ६७ विद्यार्थी, कोल्हापूर – १३ विद्यार्थी, अमरावती – २८ विद्यार्थी, नाशिक – ९ विद्यार्थी, लातूर – १८ विद्यार्थी, कोकण – ० विद्यार्थी, एकूण २८५ विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण मिळाले आहेत.


