Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे दहावी बोर्ड परिक्षेत देदीप्यमान यश कायम ! ; यंदाही १००% निकालाची परंपरा राखली.

आंबोली : सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादन करून या गौरवशाली परंपरेत मानाचा तुरा रोवला.

सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने सलग 17 वर्षे सातत्यपूर्ण १००% निकाल लावत शैक्षणिक उत्कृष्टतेचे दैदीप्यमान प्रदर्शन घडविले आहे. भारतीय सैन्यसेवेत अधिकारी पदासाठी तयारी करत असताना विद्यार्थ्यांच्या कठोर मेहनतीचे हे प्रतिक आहे.

मार्च 2025 च्या शालांत परीक्षेसाठी 50 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्या पैकी 05 विदयार्थी 90 टक्के व 40 विदयार्थी विशेष श्रेणीत व 05 विदयार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

यशवंत विद्यार्थ्यांमध्ये –

प्रथम कमांक – कॅडेट अशोक विलास घोडके 90.60%

द्वितीय कमांक – कॅडेट नील अक्षय हेगिस्टे 90.20%

 तृतीय कमांक – कॅडेट वेदांत रोहीदास वातकर 90%,

कॅडेट ओंकार मंगेश गावडे 90%

कॅडेट देवांग शैलेश बैकर 90%

सैनिक स्कूल या निवासी शाळेने वर्षभराचे सुयोग्य नियोजन, काटेकोर अंमलबजावणी, अतिरिक्त विशेष मार्गदर्शन असा आपला पॅटर्न तयार केल्याने सातत्यपूर्ण १००% व दर्जेदार निकाल लावल आपला लौकिक कायम राखला आहे.

100 टक्के निकालाची परंपरा कायम राखल्याबाबत संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय ब्रिगेडियर सुधीर सावंत व कार्यकारी अध्यक्ष श्री सुनिल राऊळ सचिव श्री. जाय डॉन्टस तसेच संचालक, श्री. शंकर गावडे, श्री. शिवाजी परब व सर्व संचालक, कार्यालयीन सचिव श्री. दिपक राऊळ सैनिक स्कूलचे प्राचार्य श्री. नितीन गावडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी वि‌द्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

इयत्ता अकरावीसाठी विज्ञान प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. आतापर्यंत अनेक वि‌द्याथ्र्यांनी NDA लेखी परिक्षेत तसेच JEE CET, NEET परीक्षेत यश प्राप्त केले आहे. शाळेचे अनेक वि‌द्यार्थी आर्मी, नेव्ही, मर्चट नेवी, बहुराष्ट्रीय कंपनी आदी क्षेत्रात अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. शाळेत निवासी सैन्य प्रशिक्षण कवायत युद्ध कौशल्य आत्मसंरक्षण, विविध साहसी खेळ व स्पर्धात्मक परीक्षांचे मागर्दशन केले जाते.

प्रवेश करीता अधिक संर्पक नं. 9420195518/7822942081

ADVT –

https://satyarthmaharashtranews.com/12262/

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles