Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर माता वैष्णो देवी धामचा ‘हा’ मोठा निर्णय !

जम्मू – काश्मीर : भारत-पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ७ मे रोजी भारतीय सैन्याने पाक व्याप्त काश्मिर आणि पाकच्या मुरीदके या अतिरेक्यांच्या फॅक्टरीवर क्षेपणास्र डागून १०० हून अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. त्यानंतर पाकिस्तानने ड्रोन हल्ला आणि क्षेपणास्र डागण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याची सर्व क्षेपणास्र भारताने परतवून लावली आहेत. या युद्धजन्य परिस्थितीत वाढ होण्याचा धोका असताना पाकने सपशेल शरणागती पत्करली आहे. त्यानंतर दोन्ही देशांनी युद्धविराम जाहीर केला.अशात आता माता वैष्णो देवी यात्रेतील भक्तांची संख्या हळूहळू वाढत आहे. श्राईन बोर्ड कटरा यांनी भक्तांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

काय केली घोषणा ?

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या श्रद्धाळूंची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. श्राईन बोर्ड काटरा ते भवनपर्यंत अनेक मोफत सुविधा पुरविण्याची घोषणा केली आहे. ज्यात निवासाची व्यवस्था आणि आरतीत बसण्याची व्यवस्था आदींचा समावेश आहे.श्रद्धाळू आधार शिबिरात कटारामध्ये माँ वैष्णो देवी यात्रेत जाणाऱ्या सर्व श्रद्धाळूंसाठी कटरामध्ये श्राईन बोर्डाच्या आशीवार्द परिसरात राहण्याची व्यवस्था मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे.भारत आणि पाकिस्तान दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.

वास्तविक,भारत-पाकिस्तान दरम्यान तणावामुळे देशभरातून भक्तांनी माता वैष्णो देवी काटराच्या आधार शिबिराच्या दिशेने कूच केले आहे. ताण आणि तणावाच्या पार्श्वभूमी यंदा श्रद्धाळूंची संख्या हळूहळू वाढत आहे.गुरुवारी रात्री १० वाजेपर्यंत ५,४२३ भाविक आधार शिबिराच्या दिशेने रवाना झाले आहेत. काटरा आणि माँ वैष्णो देवी भवन आणि अर्धकुंवारी मंदिर क्षेत्रात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.अर्धकुवारी मंदिर परिसरात रोज होणाऱ्या दिव्य आरती बसण्याच्या सुविधेचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

या शिवाय भवन मार्गावर जागोजागी निर्माण केलेल्या लंगरात भोजन, बाणगंगा क्षेत्रासह काटरा रेल्वे स्थानकात श्राईन बोर्डद्वारा भाविकांसाठी निशुल्क चहाचे काऊंटर निर्माण केले आहेत. भवनात सकाळी आणि सायंकाळी दिव्य आरतीच्या वेळी भाविकांत चहलपहल पाहायला मिळत आहे. परंतू उर्वरित काळात मात्र वैष्णो मातेचे भवन आणि यात्रा मार्ग सुनसान वाटत आहे.

त्यामुळेच काटरातील आशीवार्द परिसरात श्राईन बोर्डामार्फत भक्तांना राहाण्यासाठी मोफत व्यवस्था केली आहे.भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. श्राईन बोर्डाच्या वतीने ही मोफत सुविधा किती काळापर्यत सुरु राहील हे सांगण्यात आलेले नाही. यात्रेकरुंची संख्या पूर्ववत झाल्यानंतर बहुदा मोफत सुविधा बंद करण्यात येईल असे म्हटले जात आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles