सावंतवाडी : तालुक्यातील तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ, तळवडे संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून या परीक्षेला एकूण ८१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व विदयार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला.
यात कु. हर्षदा सुरेश केरकर हिने ९४.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक कु. रोशनी धोंडू कुंभार हिने ९२.२० टक्के गुण मिळवून पटकावला. तृतीय क्रमांक कु. सेजल सिताराम गावडे व कु.वैष्णवी उमेश नेमण या दोघींनी ९०.०० टक्के गुण प्राप्त करून पटकावला. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशालेचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच तळवडे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.


