Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

हुशार गायिकेचं अवघ्या ४४ व्या वर्षी निधन ! ; दुर्धर आजाराशी झुंज संपली, दोन गाण्यांमुळं मिळालं स्टारडम.

 गुवाहाटी : संगीत विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिकेचं निधन झालं आहे. गायिकेच्या निधनानंतर कुटुंबासोबतच चाहत्यांवर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आसामी गायिका गायत्री हजारिका यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. आपल्या गोड आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारी गायिकाचं निधन एका गंभीर आजाराने झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. तिच्या मृत्यूचे कारण कोलन कर्करोग असल्याचे सांगितले जात आहे.

गायत्री हजारिका यांनी आतापर्यंत अनेक गाणी गायली आहे. पण दोन गाण्यांमुळे तिच्या करीयरला एक वेगळी दिशा मिळाली. “ज़ोरा पाटे पाटे फागुन नामे” आणि “रति रति मोर ज़ून” या दोन गाण्यांमुळे गायत्री यांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

गायत्री बऱ्याच काळापासून कोलन कर्करोगाशी झुंजत होती. गायिकेवर उपचार देखील सुरु होते. गुवाहाटीतील नेमकेअर रुग्णालयात उपचार सुरु असताना गायिकेने अखेरचा श्वास घेतला. गायत्रीचे संगोपन आसाममध्ये झाले, त्यामुळे ती तेथील लोकांना आवडती होती. ती मुख्य गायिका आणि लाईव्ह परफॉर्मर होती.

गायत्रीच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गायिकेला श्रद्धांजली वाहिली आहेत. फार कमी लोकांना गायिकेच्या गंभीर आजाराबद्दल माहिती होतं. त्यामुळे गायिकेचं निधन आणि आजाराबद्दल कळल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे.

गायत्रीच्या मृत्यूची पुष्टी नेमकेअर हॉस्पिटलनेच केली आहे. गायत्रीच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर 20000 हून अधिक फॉलोअर्स आहेत. जे आता गायिकेच्या निधनानंतर दुःख व्यक्त करत आहेत.

सोशल मीडियावर लोक गायिकेच्या मृत्यूवर शोक व्यक्त करताना दिसत आहेत. एक नेटकरी दुःख व्यक्त करत म्हणाला, गायत्री ही एक अतिशय प्रतिभावान गायिका होती जी या धोकादायक आजाराशी लढली. गायत्रीची गाणी अजूनही विंक म्युझिक आणि गाना सारख्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles