नवी दिल्ली : दिल्ली कॅपिट्ल्सचा फलंदाज केएल राहुल याने गुजरात टायटन्स विरूद्धच्या सामन्यात इतिहास घडवला आहे. केएलने गुजरात विरुद्ध शतकी खेळी केली. केएलने यासह अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. केएलने 65 चेंडूत 4 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने नाबाद 112 धावा केल्या. तसेच केएलने 60 चेंडूत शतक पूर्ण केलं. केएलच्या आयपीएल कारकीर्दीतील हे पाचवं शतक ठरलं. केएलने यासह शुबमन गिल याला मागे टाकलं.केएलने शुबमनच्या 4 शतकांचा विक्रम मोडीत काढला. केएल यासह आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक करणारा विराट कोहली याच्यानंतर दुसरा भारतीय फलंदाज ठरला. तसेच केएल आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 3 वेगवेगळ्या संघांकडून शतक करणारा पहिला फलंदाज ठरला. केएलने दिल्लीआधी लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ससाठी शतक झळकावलं होतं. दरम्यान केएलने 33 धावा करताच आणखी एक महारेकॉर्ड केला. केएलने टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 224 डावांमध्ये 8 हजार धावा पूर्ण केल्या. केएलने यासह विराट कोहली याचा रेकॉर्ड ब्रेक केला. विराटने 243 डावांमध्ये ही कामगिरी केली होती.
केएल राहुलचं विक्रमी शतक ! ; शुबमन आणि विराटचा महारेकॉर्ड ब्रेक.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]