मुंबई : बाबा वेंगा यांचं खर नाव वेंजेलिया पांडेवा गुश्टेरोवा होतं. त्या एक महिल्या होत्या, लहानपणीच त्यांची दृष्टी गेली होती. त्यांनी आपले बहुतेक आयुष्य बल्गेरियातील बेलासिका पर्वतरांगांच्या प्रदेशात घालवले. बाबा वेंगा यांचा जन्म 31 जानेवारी 1911 रोजी झाला आणि 11 ऑगस्ट 1996 रोजी त्यांचे निधन झाले.बाबा वेंगा यांचे वडील पहिल्या महायुद्धात बल्गेरियन सैन्यात भरती झाले होते. त्यानंतर लवकरच वांगाच्या आईचे निधन झाले. यामुळे त्यांना युवावस्थेत बरेच वेळा शेजारी आणि जवळच्या कुटुंबातील मित्रांची मदत आणि दानधर्मावर अवलंबून राहावे लागले.
ज्योतीष आणि दिव्यदृष्टी असलेली बाबा वेंगा खूप प्रसिद्ध आहेत. केवळ बल्गेरियापुरत्याच त्यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या नाहीत तर जगाबाबतही त्यांनी वर्तवलेल्या भविष्यवाण्याही खऱ्या ठरल्या आहेत. दुसऱ्या महायुद्धादरम्यान, वेंगा यांची लोकप्रियता खूप वाढली. 11 ऑगस्ट 1996 रोजी कर्करोगामुळे वांगा यांचे निधन झाले. आत्तापर्यंत त्यांच्या जवळपास 10 भाकीतं किंवा भविष्यावाणी खऱ्या झाल्या आहेत.
बाबा वेंगा यांच्या खऱ्या झालेल्या भविष्यवाणी –
– दुसऱ्या महायुद्धाबद्दल
– सोव्हिएत युनियन, चेकोस्लोवाकिया आणि युगोस्लाव्हियाचे विघटन
– चेर्नोबिल दुर्घटना
– स्टॅलिनच्या मृत्यूची तारीख
– झार बोरिस तिसरा याच्या मृत्यूची तारीख
– रशियन पाणबुडी “कुर्स्क” बुडाली.
– प्रिन्सेस डायनाच्या मृत्यूची तारीख
– 1985 चा उत्तर बल्गेरियातील भूकंप
– अमेरिकेत 9/11 ला झालेला दहशतवादी हल्ला
– 2004 साली आलेली त्सुनामी
आगामी भविष्यवाणी काय ?
बाबा वेंगा यांनी येत्या, आगामी काळासाठीही भविष्यवाणी केलीआहे. त्यातील चौथी भविष्यवाणी अतिशय भयानक असून ती वाचून तुमच्या काळजाचा ठोकाच चुकू शकतो. बाबा वेंगा यांच्या भाकीतानुसार, 2025 मध्ये जगाच्या अंताची सुरूवात होईल. परंतु मानवता 5079 पर्यंत पूर्णपणे नष्ट होणार नाही. 2025 सालासाठी त्यांच्या दुसऱ्या भाकितानुसार, 2025 मध्ये युरोपमध्ये एक मोठा संघर्ष सुरू होईल. यामुळे युरोपची लोकसंख्या लक्षणीयरीत्या कमी होईल.
बाबा वांगा यांच्या मते, 2043 मध्ये युरोपमध्ये मुस्लिम राजवट असेल.
2076 पर्यंत जगभरात कम्युनिस्ट राजवट परत येईल असे भाकीतही बाबा वेंगा यांनी केलं.
बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार, 5079 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जगाचा अंत होईल.


