सावंतवाडी : येथील दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी सुजाता प्रशांत पंडित हिने नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत तब्बल 94 टक्के गुण मिळवत विद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे. तसेच तिला मराठी विषयात तब्बल 99 गुण मिळाले असून हा विद्यालयाच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद बाब असल्याचे बीकेसीचे शिल्पकार अच्युत सावंत भोसले यांनी नमूद केले.
आज सुजाता प्रशांत पंडित हिचा दहावी परीक्षेत मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सुजाताची आई डॉ. स्मिता पंडित, तसेच भोसले नॉलेज सिटीचे सर्वेसर्वा अच्युत सावंतभोसले, ॲड. अस्मिता सावंत भोसले, सौ. सुनेत्रा फाटक मॅडम, सुजाताची आई डॉ. स्मिता पंडित तसेच स्कूलच्या प्रिन्सिपल सौ. देसाई मॅडम व इतर मान्यवर उपस्थित होते
दरम्यान यावेळी सुजाताला शाळेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले व तिच्या पुढील आयुष्यासाठी मान्यवरांकडून शुभेच्छाही देण्यात आल्या.


