Saturday, November 8, 2025

Buy now

spot_img

‘SSPM’ हॉस्पिटलच्या माध्यमातून २३ रोजी पत्रकारांसाठी विशेष आरोग्य शिबीर. ; सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व रोटरी क्लब यांचे संयुक्त आयोजन.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ संलग्न सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच एस.एस.पी.एम. मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल पडवे यांच्या सहकार्याने पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘मोफत आरोग्य शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार, दिनांक २३ मे रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत साधले मेससमोरील रोटरी क्लब हॉल, सावंतवाडी येथे होणार आहे.

या शिबिरात एस.एस.पी.एम. हॉस्पिटलमधील नामांकित वैद्यकीय तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. यामध्ये अस्थिरोग तज्ज्ञ तथा त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सुधीर सांभारे, दंतरोग तज्ज्ञ डॉ. ऐश्वर्या जगताप, तसेच किडनी विकार तज्ज्ञ डॉ. प्रकाश घोगळे यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथकही शिबिरात सेवा देणार आहे.
या आरोग्य शिबिरात सहभागी होणाऱ्यांना सामान्य तपासणी, रक्तदाब मोजणी, ईसीजी (ECG) तपासणी यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील. तसेच, हिंद लॅबच्या माध्यमातून रक्त तपासणीची सुविधाही पुरवण्यात येणार आहे, ज्यामुळे विविध आजारांचे निदान वेळेत होण्यास मदत होईल.
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने सर्व पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. या शिबिरामुळे पत्रकारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य तपासणी आणि योग्य वैद्यकीय सल्ला घेण्याची उत्तम संधी मिळणार आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles