मुंबई : टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई हिने तिच्यासोबत घडलेली एक धक्कादायक घटना सांगितली आहे. अभिनयाची आवड असल्यामुळे रश्मी हिने अभिनय क्षेत्रात करीयर करण्याचे प्रयत्न सुरु केले. पण एकदा ऑडिशन दरम्यान अभिनेत्रीला धक्कादायक अनुभव आला. तेव्हा अभिनेत्री फक्त 16 वर्षांची होती. एका पुरुषाने रश्मीला बहाण्यााने बोलावलं आणि तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यासोबत वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न केला. अनेक वर्षांनंतर अखेर अभिनेत्रीने स्वतःसोबत घडलेली घटना बोलून दाखवली आहे.
एका मुलाखतीत रश्मी देसाई म्हणाली, ‘मी तेव्हा अभिनयासाठी फार उत्साहित होती. एकेदिवशी मला ऑडिशनसाठी फोन आला. ऑडिशनसाठी फोन आल्यामुळे मी ठरलेल्या ठिकाणी पोहोचली. पण पोहोचल्यानंतर मला कुठेच कॅमेरा दिसला नाही. तेथे फक्त एक व्यक्त उपस्थित होता. त्या पुरुषाने मला कोल्ड ड्रिंक ऑफर केली, त्यामध्ये गुंगीचं औषध होतं.
‘परंतू त्याचा हेतू मला बेशुद्ध करून मानसिकदृष्ट्या माझ्यावर वर्चस्व गाजवण्याचा होता. पण मी लगेचच कडक शब्दांत नकार दिला आणि स्पष्टपणे सांगितले की मी हे सर्व करणार नाही. मी कसं तरी धाडस केले आणि माझा जीव वाचवत तिथून बाहेर पडली आणि घरी पोहोचताच मी आईला संपूर्ण घटना सांगितली… असं देखील अभिनेत्री म्हणाली.
एवढंच नाही तर, इंडस्ट्रीमध्या चांगले – वाईट दोन्ही प्रकारचे लोकं राहतात.. असं देखील रश्मी म्हणाली. ‘अशा परिस्थितीचा सामना अनेक महिलांनी केला आहे. फरक फक्त एवढा आहे की, काही महिला शांत बसतात. तर काही महिला समोर येऊन परिस्थिती सांगतात. वयाच्या 16 व्या वर्षी माझ्यासोबत ही धक्कादायक घटना घडली आहे.
घडलेल्या घटनेनंतर रश्मीने तेथून पळ काढला आणि सर्वकाही घरी आल्यानंतर आईला सांगितलं. अशात अभिनेत्रीची आई त्या दिग्दर्शकावर प्रचंड भडकली. एवढंच नाही तर, दुसऱ्या दिवशी अभिनेत्री आई दिग्दर्शकाकडे गेली आणि त्याच्या कानशिलात लगावली… सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे. रश्मी देसाई हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील रश्मी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर रश्मीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.


