सावंतवाडी : तालुक्यातील किनळे येथील शमिता प्रशांत तळवणेकर हिने, एसएससी बोर्ड परीक्षेत ९९ % गुण मिळवीत वेंगुर्ले तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला. रेडी येथील मातोश्री पार्वती राऊत , विद्यालयाची(इंग्रजी माध्यम) ही विद्यार्थीनी असून,निसर्गाने भरभरून दिलेल्या किनळे( ता. सावंतवाडी) सारख्या गावातून एका सर्वसामान्य कुटुंबातील कु.शमिता हिने आपल्या आई वडिलांच्या प्रेरणेतून व मातोश्री पार्वती राऊत विद्यालयातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ,एस एस सी बोर्ड परीक्षेत ९९,% टक्के गुण मिळवीत उल्लेखनीय असे यश संपादन केले.
(शमिताचा सत्कार करतांना आई वडील)
किनळे येथून जवळ जवळ पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या तिच्या विद्यालयात जाऊन तसेच रोजच्या अभ्यासाचं वेळापत्रक ठरवून तिने आपला दहावीचा अभ्यासक्रमाचे नियोजन करून अभ्यास सुरू केला.त्यात तिला तिच्या शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व आई सौ. प्राजक्ता व वडील श्री प्रशांत तळवणेकर यांची प्रेरणा व आशीर्वाद त्यात करून शमिता हिने कठोर मेहनत घेत हे यश संपादन केले.

तिच्या या अथक प्रयत्नांची दखल तिच्या विद्यालयाने ,वेगवेगळया सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी, संस्थांनी,गावातील ग्रामस्थांनी घेत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत योग्य असा सन्मान केला.
त्याचप्रमाणे ,किनळे गावचे सरपंच श्री दिपक नाईक यांनी आपल्या किनळे गावची शान वाढवल्याबद्दल कुमारी शमिता तळवणेकर हीचा सन्मान केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सरपंच श्री दिपक नाईक यांनी शमिता च्या या यशाबद्दल बोलताना सांगितले की, खरोखरच शमिता ने मिळविलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा दायक असून,प्रत्येक मुलांनी जर नियोजपूर्वक अभ्यास,मोबाईलचा वापर कमी ,शाळेतील शिक्षकांनी दिलेला अभ्यास लक्षपूर्वक केल्यास यश संपादन करता येते हे शमिताने दाखऊन देत आपल्या गावाची ,शाळेची शान वाढवलीआहे.


