Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणूकीत विद्यातपस्वी चिंतामणी तोरसकर स्वप्नपूर्ती पॅनेल बहुमताने विजयी ! ; अध्यक्ष पदी रविकिरण तोरसकर तर उपाध्यक्ष पदी निशांत तोरसकर यांची निवड.

सावंतवाडी : कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळ कोलगाव,सिंधुदुर्ग ही संस्था शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून संस्थापक म्हणून कै. चिंतामणी तोरसकर यांचा या संस्थेच्या वाटचालीत मोठं योगदान आहे. त्यांच्या पश्चात त्यांची स्वप्नपूर्ती व्हावी या दृष्टीकोनातून संस्थेतील विविध घटकातील सभासदांनी कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकत्र येऊन विद्यातपस्वी चिंतामणी तोरसकर स्वप्नपूर्ती पॅनल सदर निवडनूकीस उभे केले होते. यामध्ये अध्यक्ष श्री. रविकिरण तोरसकर, उपाध्यक्ष श्री. निशांत तोरसकर, सचिव सौ. पूनम नाईक, सहसचिव डॉ.ज्योती रविकिरण तोरसकर ,खजिनदार श्री. हेमंत वालकर, कार्यकारीनी सदस्य श्रीम. संगीता तोरसकर, सौ. अलका नारकर, श्री.देवेंद्र राऊळ, श्री.मनोज सातार्डेकर, श्री.दयानंद सराफ, श्री.प्रवीण आचरेकर श्री.गणेश आरोंदेकर, श्री.नितीन सावंत, सौ.चित्रलेखा हिंदळेकर, श्री.प्रसन्ना राठोड असे सर्व पंधरा सदस्य बहुमताने निवडून आले. काल दिनांक २५/०५/२०२५ रोजी संस्थेची निवडणूक कोलगाव माध्यमिक विद्यालय पार पडली. धर्मदाय आयुक्त कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या देखरेखी खाली सदरची निवडणूक पार पडली. विजयी उमेदवार यांना संस्थेचे आजीव सभासद डॉक्टर विवेक रेडकर व सर्व सभासदांनी तसेच धर्मदाय आयुक्त कार्यालय कर्मचारी यांनी शुभेच्छा देऊन शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य विषयक विषयात संस्था मजबुतीने काम करेल असा आशावाद व्यक्त केला.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles