कणकवली : गोपुरी आश्रमात रविवार दिनांक १ जून, २०२५ रोजी सकाळी ०९ ते दुपारी १२.३० या वेळेत टेबल टेनिस खेळाची प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या मुलांना प्रवेश दिला जाणार आहे.
टेबल टेनिस हा खेळायला अत्यंत सोपा असा वेगवान खेळ आहे. या खेळाचे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि बौद्धिक दृष्ट्या अनेक फायदे विशेषत: विद्यार्थ्यांना होऊ शकतात.
यावेळी तज्ज्ञ प्रशिक्षक नितीन तळेकर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी मालवण येथे गेली १५ वर्षे टेबल टेनिस खेळाचे प्रशिक्षण देणारे श्री. विष्णू कोरगावकर सर, ‘टेबल टेनिस खेळ आणि त्याचे होणारे फायदे’ याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेबल टेनिस खेळामध्ये प्राविण्य मिळवणारे काही खेळाडू या दिवशी टेबल टेनिस खेळाचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत व मुलांचीही प्रॅक्टिस घेतली जाणार आहे.
तरी या कार्यशाळेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन गोपुरी आश्रम परिवारातर्फे करण्यात आले आहे. ज्यांना पुढे शिकायचे आहे त्यांच्याकरिता दिनांक- २ जून,२०२५ पासून १० दिवसांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. त्यानंतर गोपूरी आश्रमात टेबल टेनिस खेळ वेगवेगळ्या बॅच मध्ये कायमस्वरूपी चालू राहणार आहे. अधिक माहितीसाठी संयोजक संदीप सावंत (9421235839) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गोपुरी आश्रम परिवारातर्फे करण्यात आले आहे.
गोपुरी आश्रमात १ जून रोजी टेबल टेनिस खेळाबाबत कार्यशाळा.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


