- वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली जनतेची मागणी पूर्णत्वास.
- प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा तीन मध्ये मिळाले नऊ रस्ते.
कणकवली : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा तीन अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित असलेल्या ९ रस्त्यांच्या कामांना अखेर मंजुरी मिळाली आहे. राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत बैठक घेऊन या कामांना मंजुरी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या नव्याने मंजूर केलेला नऊ रस्त्यांच्या कामांसाठी 28 कोटी 73 लाख रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या या नऊ रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळालेली असल्याने ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे.तर त्या ठिकाणी जनतेची गैरसोय दूर होणार आहे. रस्त्याच्या कामांची मंजूरी मंत्रालयस्तरावर होत असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या प्रयत्नाने दिनांक १३ मे २०२५ रोजी ग्रामविकास मंत्री नाम. जयकुमार गोरे यांच्या सोबत बैठकीत झाली. यावेळी प्रस्तावित कामातील असलेल्या अडचणी दूर करून या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. -
मंजूर झालेली कामे –
कणकवली – तरंदळे ते सावडाव रस्ता, मालवण – गुरामवाडी मोगरणे रस्ता, देवगड – धालवली फणसगाव रस्ता, देवगड – पडवणे पाल्येवाडी रस्ता, कुडाळ – निवजे ओझरवाडी रस्ता, सावंतवाडी – नेतर्डे डोंगरपाल रस्ता, सावंतवाडी – आजगाव तिरोडा रस्ता, वैभववाडी – लोरे गडमठ रस्ता, वैभववाडी – कुसुर डीगशिवाडी रस्ता असे हे महत्त्वाचे नऊ रस्ते मंजूर करण्यात आलेले आहे.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सिंधुदुर्गातील २८ कोटी ७३ लाख रुपयांचे ९ रस्ते मंजुरी ! ; पालकमंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील बैठकीत मंजुरी.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


