Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

बापरे! – फ्रान्सच्या राष्ट्रपतींना पत्नीने सर्वांसमोर मारली थापड? ; तोंड लपवू लागले इमॅन्युएल मॅक्रॉन.

हनोई : फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मॅक्रॉन यांची पत्नी त्यांना थापड मारताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे फ्रान्सचे राष्ट्रपती भवन द एलिसी पॅलेसमध्ये खळबळ उडाली आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा हा व्हिडिओ व्हिएतनामची राजधानी हनोईचा आहे. येथे मॅक्रॉन पत्नी ब्रिजिट मॅक्रॉनसह राजकीय दौऱ्यावर आहेत. या घटनेनंतर, इमॅन्युएल मॅक्रॉन आपला चेहरा लपवतानाही दिसत आहेत.
हा व्हिडिओ रविवारचा (२५ मे २०२५) असल्याचे बोलले जात आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे फर्स्ट लेडीसह हनोईमध्ये पोहोचताच विमानाचा दरवाजा उघडतो, याच वेळी ब्रिजिट मॅक्रॉन राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्या चेहऱ्यावर मारताना आणि ढकलताना दिसत आहेत. याच वेळी, इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या लक्षात येते की, कॅमेरामन आणि मीडिया बाहेर उभा आहे. तेव्हा ते थोडे गडबडतात. मात्र, लगेचच स्वतःला सावरत हसून माध्यमांकडे हात हलवतात आणि नंतर विमानात जातात. यानंतर, ते विमानातून खाली उतरले. मात्र, एकमेकांचा हात धरून खाली उतरले नाही. महत्वाचे म्हणजे, त्यावेळी इमॅनुअल मॅक्रॉन थोडे अस्वस्थही वाटत होते.
फ्रेंच राष्ट्रपती राजवाडा एलिसी पॅलेसने सुरुवातीला विमानात असे काही घडले असल्याचे नाकारले होते. मात्र नंतर, हे जोडप्यातील किरकोळ भांडण होते. एलिसी हाऊसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन एकमेकांची थट्टा करत होते आणि त्यांची छेड काढत होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या एका जवळच्या मित्राने याला पती-पत्नीमधील सर्वसाधारण भांडण असे म्हटले आहे.
खरे तर, इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिजिट मॅक्रॉन यांची प्रेम कहाणी प्रसिद्ध आहे. दोघांमध्ये २४ वर्षांचे अंतर आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन १५ वर्षांचे असताना ३९ वर्षीय ब्रिजिट यांच्या प्रेमात पडले होते. ब्रिजिट आधीच विवाहित होत्या आणि त्यांना तीन मुलेही होती. ब्रिजिट मॅक्रॉन यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की त्या एका कॅथोलिक शाळेत शिक्षिका होती आणि इमॅन्युएल त्यांचा विद्यार्थी होता. ब्रिजिट यांनी पहिल्या पतीला घटस्फोट दिला आणि दोघांनीही २००६ मध्ये लग्न केले. त्यावेळी इमॅन्युएल मॅक्रॉन २९ वर्षांचे होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles