सावंतवाडी : तालुक्यातील माजगाव कुंभारवाडा येथील विष्णू मंगेश चाफेलकर (वय ३०) या युवकाचे शनिवारी सकाळी गोवा बांबुळी रुग्णालयात निधन झाले. गेले दोन दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र अखेर त्याचे निधन झाले. त्याच्या अकाली निधनाचे वृत्त समजताच कुंभारवाडा परिसरात शोककाळा पसरली. आई तसेच भावाला धक्काच बसला. त्याचा मृतदेह दुपारी माजगावात आणल्यानंतर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. विष्णू चाफेलकर हा कारवार येथील हॉस्पिटलमध्ये डायलिसिस टेक्निशियन होता. राजन चाफेलकर यांचे ते बंधू होते. त्याच्या पश्चात आई, एक भाऊ असा परिवार आहे. विष्णू चाफेलकर हा कारवार येथील हॉस्पिटलमध्ये डायलिसिस टेक्निशियन होता
माजगावच्या ‘विष्णू’ची मनाला चटका देणारी अकाली ‘एक्झिट’. ; चाफेलकर कुटुंबीयांवर कोसळला दुःखाचा डोंगर.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


