Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

देवगड तालुक्यातून ३.३१ लाखांचा अवैध खत साठा जप्त ! ; विक्रेत्यावर गुन्हा दाखल.

सिंधुदुर्गनगरी : देवगड तालुक्यातील मौजे कातवणेश्वर येथे कृषी विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 3.31 लाख रुपये किमतीचा अनधिकृत खत साठा जप्त केला आहे. या प्रकरणी कृषी सेवा केंद्राचे मालक राहुल राजेश जोईल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिली आहे.
जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, यांना मौजे कातवणेश्वर येथील सुखकर्ता कृषीसेवा केंद्र या निविष्ठा केंद्राचे नजीकच्या शेतमांगरात कृषीसेवा केंद्राचे मालक राहुल राजेश जोईल, रा. कुणकेश्वर कातवणेश्वर ता. देवगड हे अवैधरित्या रासायनिक व सेंद्रीय खताचा साठा व विक्री करत असलेबाबत दिसुन आले. संबधितांना विचारणा केली असता त्यांच्या जवळ खत विक्रीसाठी आवश्यक परवाना नसल्याचे आढळून आले.
त्यामुळे देवगड पोलीस ठाणे येथुन पोलीस मदत घेवुन शेतमांगराची तपासणी केली असता त्यामध्ये-(i) महाराष्ट्र बायो फर्टीलायजर इंडिया प्रा.लि या कंपनीचे ब्राउन गोल्ड ऑरगॅनिक म्यँनुअर प्रत्येकी 50 किलो बँग प्रत्येक बँगची किंमत 975 रुपये असे एकुण 156 बैंग, बँग क्रं. BG01, उत्पादन तारीख एप्रिल 2025 ची मिळुन किंमत सुमारे रु. 1,52,100, (ii) यारा फर्टीलायजर इंडिया प्रा. लि. या कंपनीचे NPK 12.11.18 या ग्रेडची प्रत्येकी 25 किलो बँग प्रत्येक बँगची किंमत 3200 रुपये असे एकुण 56 बँग, बँच क्रं. 143604 उत्पादन तारीख 09.2024 ची मिळुन किंमत सुमारे रु. 1,79,200 असा एकूण रक्कम रु. 3,31,200 किंमतीचा अवैध खत साठा आढळुन आलेला आहे. याअवैध खत साठा जि.गु.नि.नि. सिंधुदुर्ग यांनी स्थानिक पंच, पोलीस उपनिरिक्षक पोलीस ठाणे, देवगड़ आणि कृषी अधिकारी, पंचायत समिती देवगड यांच्या समवेत पंचनामा करून शेतमांगर वजा इमारतीचे मुख्य दरवाज्यास कुलुप लावुन त्यावर सही शिक्क्यानिशी सील करून जप्त केलेला आहे.
ही कारवाई अत्यावश्यक वस्तु कायदा 1955 आणि खत नियंत्रण आदेश 1985 मधील कायद्यांनुसार करण्यात आली आहे. या प्रकरणी, संबंधित अनधिकृत खत विक्रेता याच्या विरोधात संबंधित कायद्यानुसार देवगड पोलिस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभाग आणि पोलीस प्रशासन या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.कृषी विभागाच्या धडक कारवाईमुळे खतांच्या अवैध विक्रीला आळा बसण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक दुकानातूनच खते खरेदी करावीत आणि खरेदी करताना पक्के बिल घ्यावे तसेच कोणत्याही प्रकारच्या अवैध विक्रीबाबत माहिती मिळाल्यास कृषी विभागाला कळवावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.
०००००

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles