Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

विराट कोहलीची स्वप्नपूर्ती !, ‘बंगळुरू’ आयपीएलचा नवा चॅम्पियन ! ; पंजाबवर ६ धावांनी विजय.

अहमदाबाद : शेवटच्या क्षणांपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने IPL 2025 चं विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरसीबीचं नाव आयपीएलच्या विजेत्यांच्या ट्रॉफीवर कोरलं गेलं. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अनेक अपयश पाहिलेल्या या संघाने रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज यंदा पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचून विजेतेपदाच्या खूप जवळ आला होता. मात्र अंतिम क्षणी RCB ने केलेल्या उत्कृष्ट खेळीने पंजाबचं स्वप्न भंगलं.

विराट कोहलीची स्वप्नपूर्ती! 

विराट कोहलीसाठी हा क्षण अत्यंत भावनिक ठरला. आयपीएलमध्ये अनेक वैयक्तिक विक्रम गाठणाऱ्या या दिग्गज खेळाडूचं संघाला चॅम्पियन बनवण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या RCB ने याआधी अनेकदा प्लेऑफ आणि फायनल गाठल्या होत्या, पण ट्रॉफी नेहमी हुलकावणी देत होती. यंदा मात्र रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाने सर्व बॅटिंग-बोलिंग डिपार्टमेंटमध्ये समतोल कामगिरी करत अखेरच्या क्षणी बाजी मारली.

या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. काइल जेमिसनने फिल साल्टला आऊट करून पंजाबचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले, साल्ट 16 धावा करून बाद झाला, तर संघाकडून विराट कोहलीने 43 धावा केल्या, मयंक अग्रवालने 17 चेंडूत 24 धावा केल्या, ज्यात 2 चौकार आणि एक षटकार होता.

शेवटच्या 19 धावा करताना पडल्या 4 विकेट –

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शेवटच्या 19 धावा करताना 4 विकेट गमावल्या, तर शेवटच्या 5 षटकात 58 धावा करताना 5 विकेट गमावल्या. एकेकाळी आरसीबीचा स्कोअर 5 विकेटवर 171 धावा होता, तर डाव संपला तेव्हा 9 विकेटवर 190 धावा होत्या. दरम्यान, जितेश शर्मा (24), रोमारियो शेफर्ड (17), कृणाल पंड्या (4) आणि भुवनेश्वर कुमार (1)आऊट झाले.

काइल जेमिसन आणि अर्शदीप सिंगने घेतल्या 3-3 विकेट –

पंजाब किंग्जकडून काइल जेमिसन आणि अर्शदीप सिंगने 3-3 विकेट घेतल्या. अर्शदीप सिंग देखील महागडा ठरला. त्याने 4 षटकात 40 धावा दिल्या, तर अझमतुल्लाहने 4 षटकात 35 धावा दिल्या आणि विराट कोहलीच्या रूपात मोठी विकेट घेतली. विजय कुमारने 4  षटकांत 30 धावा देत एक विकेट घेतली आणि युजवेंद्र चहलने 4 षटकांत 37 धावा देत 1 विकेट घेतली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles