पर्यावरणाची कास धरावी – स
वंतवाडी : अलीकडे सातत्याने अवकाळी पाऊस का पडतो? याचे कारण म्हणजे वाढलेले ग्लोबल वॉर्मिंग. पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे त्यामुळे सगळ्यांनी पर्यावरणाचे कास धरून दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपण करणे गरजेचे आहे असे मत सावंतवाडी नगर परिषदेचे माजी आरोग्य सभापती व भाजपा शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांनी व्यक्त केले.
सावंतवाडी शहरातील भटवाडी येथील ब्राह्मण देवालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सुधीर आडिवरेकर बोलत होते. भारतीय जनता पार्टी च्या वतीने सावंतवाडी शहर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला असून आगामी काळात विविध ठिकाणी वृक्षारोपण केले जाणार आहे आज सावंतवाडी येथील भटवाडी परिसरात त्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सुधीर आडिवरेकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


