दोडामार्ग : झोळंबे येथील शिवशक्ती ग्रामविकास बहुउद्देशीय मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. झोळंबे सारख्या ग्रामीण गावात झालेल्या या रक्तदान शिबिरात २२ जणांनी रक्तदान केले.
झोळंबे प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या या शिबिराला दोडामार्ग पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, सरपंच विशाखा नाईक, माजी सरपंच राजेश गवस, डॉ दिव्या गवस, डॉ निकिता नाईक, आरोग्य सेविका मिरा कुरुडे, तंटामुक्ती अध्यक्ष सुखाजी गवस, माजी उपसभापती धनश्री गवस, जगदीश गवस, पोलिस पाटील संजय गवस, देवस्थान कमिटी अध्यक्ष शंकर गवस, मुंबई मंडळ अध्यक्ष विष्णू गवस आदी उपस्थित होते.
सावंतवाडी रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ मनिषा सावंत, अनिल खाडे, प्राजक्ता रेडकर, मानसी बागेवाडी, अस्लम शेख यांनी रक्त संकलन केले. या रक्तदान शिबिरात रुपेश गवस, किशोर झोळंबेकर, रमेश पालकर, सुनिल राऊळ, हरी उर्फ भुषण भिडे, संकेत गवस, सुधीर उर्फ मुन्ना गवस, नारायण उर्फ हसी झोळंबेकर, संतोष वझे, दिलीप घोगळे, नारायण उर्फ बाबलो गवस, बाबली गवस, प्रसाद गवस, नारायण उर्फ गोटलो गवस, दीपक गवस, ओम गवस, जगदीश गवस, हेमंत सावंत, सुधीर गवस, परेश म्हात्रे, विलास कांबळे, उज्वल ओटकवडे आदींनी रक्तदान केले.
यावेळी प्रकाश तेंडोलकर रक्तदान चळवळ याबाबत बहुमोल मार्गदर्शन केले. गणेशप्रसाद गवस यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जगदीश गवस यांनी केले. या रक्तदान शिबिराचे नियोजन शिवशक्ती ग्रामविकास बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष दिलीप घोगळे, उपाध्यक्ष मुन्ना गवस, सचिव हेमंत सावंत, खजिनदार विशाल गवस, सुधीर गवस, रुपेश गवस, विलास गवस, पांडुरंग गवस यांनी केले.
झोळंबे येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद! ; शिवशक्ती ग्रामविकास बहुउद्देशीय मंडळाचे आयोजन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


