Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

नॅब सिंधुदुर्गतर्फे हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त दृष्टीबाधितांचा स्नेह मेळावा संपन्न.

सावंतवाडी : नॅशनल असोसिएशन् फॉर दी ब्लाईंड सिंधुदुर्ग सावंतवाडी यांच्यातर्फे नॅब नेत्र रूग्णालयाच्या सभागृहामध्ये हेलन केलर यांच्या जन्मदिनाप्रित्यर्थ सिंधुदुर्गातील दृष्टीबाधिताचा स्नेह मेळावा भरवण्यात आला होता.

या कर्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बॅन्क ऑफ इंडीयाचे निवृत्त शाखाधिकरी नंदकुमार प्रभूदेसाई हे उपस्थित होते. आपल्या भाषणातून त्यांनी मार्गदर्शनपर व सकारात्मक विचार मांडले. दृष्टीबाधितांनी आपले विचार सकारात्मक ठेवावे, नवनविन कौशल्य आत्मसात करावे, नवनविन गोष्टीबाबत माहिती करून घ्यावी, बेल लीपी सगळ्यांनी शिकून घ्यावी, समाज तुमच्या बरोबर आहे याची खात्री बाळगा, न्याय हक्क मिळवा, कर्तव्य विसरू नका, कष्टाला प्राधान्य द्या, दृष्टीबाधितानी जगण्याचे कौशल्य जाणून घेऊन आपली प्रगती साधावी, शिक्षण व्यवसाय महत्वाचा आहे. कष्टांनी तुमचा कठीण काळ बदलेल याची खात्री बाळगा. सामाजिक बांधिलकीची जाणीव असणारा समाज तुमच्या बरोबर कायम असणार याची खात्री बाळगा. नॅब ही संस्था आपल्यासठी सर्वतोपरी भरीव असे कार्य करीत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

नॅब अध्यक्षांनी पाहुण्याचा परिचय व नॅब सिंधुदुर्गच्या एकंदरीत प्रगतीचा आढावा घेतला. नॅब नेत्र रुग्णालय गोरगरिबांसाठी नेत्र तपासणी, शस्त्रक्रीया अगदी परवडणाऱ्या दरात करते याबद्दल अध्यक्षानी सविस्तर माहिती दिली. नॅब सचिव यांनी प्रास्ताविक केले. तर नॅबच्या खजिनदार श्रीम. विनया बाड यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी डॉ. सुहास नायडु, श्री. सुहास सातोसकर, श्री. प्रविण परब, डॉ. स्नेहल गोवेकर, श्री. रामदास पारकर व दृष्टीबाधीत लाभार्थी उपस्थित होते. खजिनदार यांनी आभारप्रदर्शन केलं.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles