मुंबई : आमची वैचारिक ऊंची ठरवणारे तुम्ही कोण? असा सवाल उपस्थित करत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केलेल्या टीकेवर माजी मंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी उत्तर दिलं आहे. ताकद नाही तर राज ठाकरेंना प्रचारासाठी का बोलावलं होतं, असं म्हणत प्रकाश महाजन यांनी टीका केली होती. त्यावर आता नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाजन तुम्ही लायकी पेक्षा अधिक बोलत आहात असं म्हणत राणेंनी प्रकाश महाजन यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
दरम्यान, नितेश राणे यांनी काल ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर खिल्ली उडवली होती. त्यानंतर राणे यांच्यावर प्रकाश महाजन यांनी काल टीका केली होती.


