बंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणातून सर्वांत मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची एकूण 100 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. कोट्यवधी रुपयांच्या कथित घोटाळ्यात सिद्धरामय्या यांच्याशी संबंधित एकूण 92 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
सिद्धरामय्या यांच्यावर नेमका आरोप काय?
सिद्धरामय्या यांच्यावर त्यांनी त्यांच्या राजकीय प्रभावाचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर केल्याचा आरोप आहे. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी अर्थात MUDA ने 3 एकर 16 गुंठे जमीन अधिगृहित केली होती. याच जमिनीच्या बदल्यात सिद्धरामय्या यांनी त्यांची पत्नी बीएम पार्वती यांच्या नावे 14 आलिशान साईट्स नावावर करून घेतल्याचा आरोप आहे.


