सावंतवाडी : मालवणच्या ऐतिहासिक व साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांचे पाय ज्या जलदुर्गाला लागले त्या सिंधुदुर्ग किल्ल्यास लागून घाईगडबडीत उभारलेला व खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा केवळ एका वर्षात पडणं हि घटना तमाम मराठी जनतेसाठी संतापजनक व लाजीरवाणी असून यासाठी दोषी असणाऱ्या सर्वांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी केली आहॆ. ज्या ठिकाणी हा पुतळा उभारण्यात आला आहॆ त्याच्या बरोबर समोर महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग गेली साडेतीनशे वर्ष समुद्राच्या अजस्र लाटा वादळ वार यांच्या माऱ्याला तोंड देवून अभिमानाने आजही उभा आहॆ. मात्र भ्रष्टाचाराची किड लागलेल्या आजच्या शासकीय यंत्रणेला या कशाचेही सोयरसुतक नाही. आपण करत असलेले काम किती मजबूत आहॆ याचे साधे ज्ञान या अधिकारी वर्गाला नसावे याचे आश्चर्य वाटते. या दुदैवी घटनेने तमाम मराठी जनतेच्या मनात संतापाची लाट उसळली असून जे कोणी यात दोषी असतील व ज्यांनी हलगर्जीपणा पणा केला त्या सर्वांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसे तर्फे अँड. अनिल केसरकर यांनी केली आहॆ.
ADVT –



