सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचेच वंदनीय असून आपले दैवत आहेत. महाराजांचा पुतळा कोसळणे ही घटना अत्यंत दुर्दैवी असून ह्या सी, महाराजांबद्दल आदर ठेवावा, उगीच यात राजकारण आणू नये, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले. घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. महाराजांचा पुतळा पुनश्च महाराष्ट्र सरकार उभारून देईल आणि तो उभारताना संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असा उभारला जाईल असेही मंत्री दीपक केसरकर म्हणाले. मंत्री केसरकर यांनी आज सावंतवाडी येथील आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते.
मंत्री दीपक केसरकर पुढे म्हणाले, मालवण राजकोट येथे घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र हा अपघात करत असताना त्यामध्ये काही शुभ संकेतही असावेत, अशी आपली भावना आहे. कारण कारण हा पुतळा किल्ल्याच्या तटापेक्षा जास्त उंचीचा असावा, अशी सिंधुदुर्गवासियांची मागणी होती. परंतु तो दीडशे फुट इतका उभारण्यात आला होता. मात्र आता नव्याने उभारताना तो पुतळा दीडशे फुट इतका उंचीचा उभारावा, यासाठी महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न असणार आहेत. त्या निमित्ताने पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधानांना आपण या ठिकाणी आणू शकलो तर ती महाराजांसाठी एक प्रकारे आदरांजली असेल. तसेच हा पुतळा महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेल असा उभारला जाणार आहे.
ADVT –



