सावंतवाडी : व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी माडखोलमध्ये 31 मे 2025 रोजी महाविद्यालयात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल अणि युनीकेम लॅबोरेटरीस, गोवा यांचे मार्फत कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता. या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये बी. फार्मसी 2024-25 मधील अंतिम वर्षाच्या अकरा विद्यार्थ्यांची प्रोडक्शन डिपार्टमेंट, पाच विद्यार्थ्यांची क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट आणि आठ विद्यार्थांची क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंट मध्ये निवड झाली. कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह साठी समन्वयक म्हणून सह प्राध्यापक योगेश पुजारी आणि सह प्राध्यापिका नीलम सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांना संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री पंकज पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे आणि प्लेसमेंट ऑफिसर डॉ. संदेश सोमनाचे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे संस्थेचे आधारस्तंभ व प्रेरणास्थान माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील व संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार डॉ. राहुल पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी माडखोलच्या विद्यार्थ्यांची गोव्यातील युनीकेम लॅबोरेटरीज फार्मा कंपनीत निवड.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


