Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

अफ्रिका २८२ धावांचं लक्ष्य गाठणार का? ; लॉर्ड्सवर आतापर्यंत ‘असा’ आहे रेकॉर्ड.

लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर सुरु आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा खेळ 207 धावांवर आटोपला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडे 74 धावांची आघाडी होती. यासह ऑस्ट्रेलियाच्या 281 धावा झाल्या आणि विजयासाठी 281 धावांचं आव्हान दिलं आहे. आता दक्षिण अफ्रिका 282 धावांचं आव्हान गाठणार का? असा प्रश्न आहे. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेने पहिला विकेट अवघ्या 9 धावांवर गमावला. त्यानंतर दुसरा विकेट 70 धावांवर पडला. पण एडन मार्करम आणि कर्णधार टेम्बा बावुमा यांनी 100 हून अधिक धावांची भागीदारी केली. तसेच मार्करमने 80 हून अधिक धावांची खेळी केल्याने विजयाची अपेक्षा वाढली आहे. तर कर्णधार टेम्बा बावुमा अर्धशतकी खेळीसह मैदानात पाय रोवून बसला आहे. त्यामुळे हा सामना ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात सहज जाईल असं वाटत होतं. पण आता दोन्ही बाजूने समान संधी असल्याचं दिसत आहे. जर दक्षिण अफ्रिकेने 282 धावांचं आव्हान गाठलं तर इतिहास रचला जाईल. कारण या मैदानावर इतकं मोठं आव्हान गाठण्याचा इतिहास खूपच दुर्मिळ आहे. यापूर्वी इतक्या मोठ्या धावांचा पाठलाग करणं फक्त वेस्ट इंडिज संघाला जमलं आहे. लॉर्ड्सवर वेस्ट इंडिजने 1984 मध्ये 344 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला आहे. यजमान इंग्लंडला देखील 300 हून अधिक धावांचा पाठलाग करता आलेला नाही. या व्यतिरिक्त 1984 पासून आतापर्यंत चौथ्या डावात सर्वाधिक धावांचा पाठलाग करणं कोणत्याही विदेशी संघाला शक्य झालं नाही. 1992 मध्ये इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानने 141 धावांचे लक्ष्य गाठलं होतं. त्यानंतर 41 वर्षात कोणत्याही विदेशी संघाला 150 हून अधिक धावा गाठता आल्या नाहीत.

लॉर्ड्सवर वेस्ट इंडिजनंतर सर्वाधिक धावा गाठण्याच्या विक्रम यजमान इंग्लंड संघच्या नावावर आहे. इंग्लंडने न्यूझीलंडविरुद् 282, इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध 279, इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध 218 आणि इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध 193 गाठल्या आहेत. विदेशी संघाच्या यादीत वेस्ट इंडिजनंतर पाकिस्तानचा क्रमांक लागतो. पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध 141, भारताने इंग्लंडविरुद्ध 136, ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध 131 आणि ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध 127 धावांचं लक्ष्य गाठलं आहे.

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles