- ४०० कोटींचा आराखडा असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुग्णवाहिकेची बॅटरी घालण्यासाठी पैसे नाहीत हे दुर्भाग्य ! : योगेश धुरी.
कुडाळ : तालुक्यातील माणगाव खोरे हे अतिशय ग्रामीण भाग मात्र या ग्रामीण भागात आरोग्य विभागाची दयनीय अवस्था आहे. माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हे एकमेव ग्रामीण भागातील लोक उपचारासाठी माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात.मात्र कधी औषध कमी तर कधी डॉक्टर नाही.तर गेले महिनाभर रुग्णवाहीकाच बंद आहे, अशी परीस्थिती पाहायला मिळत आहे
रुग्णवाहीका माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून मिळाली होती. त्यानंतर १०८ ची रुग्णवाहीका मिळावी, यासाठी देखील प्रयत्न करुन ती मंजूर पण झाली मात्र अद्याप ती शासनाकडून दिली गेली नाही. वैभव नाईक आमदार असताना सातत्याने ते आपल्या मतदारसंघात लक्ष देत होते.
रुग्णवाहीका नसल्याने रुग्णांची परवडत होत आहे माणगाव आरोग्य केंद्राला एक MBBS डॉक्टर पद मंजूर आहे मात्र अद्याप पर्यंत ह्या जागेवर BAMS डॉक्टर काम करीत आहेत
४०० कोटीं जिल्ह्याचा आराखडा, निधी आणू निधी कमी पडू देणार नाही असं म्हणणाऱ्यां कडे रुग्णवाहिकेची बॅटरी घालण्यासाठी ८००० रुपये नाहीत हे जिल्ह्याच्या दृष्टीने भूषणावह नाही.
पुढील चार दिवसांत रुग्णवाहिका चालू करा.आरोग्य विभागाला ४ दिवसाचा अल्टीमेट देत आहोत चार दिवसात रुग्णवाहीका चालू झाली नसेल तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असे युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी आरोग्य विभागाला अल्टिमेटम दिला आहे. यावेळी डॉक्टर सावंत, माणगाव उपसरपंच बापू बागवे, युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी, शिवसेना माणगाव उपविभागप्रमुख एकनाथ धुरी, शिवसेना शहरप्रमुख सचिन भिसे, विनायक नाईक उपस्थित होते.


