Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

रक्तदान शिबीर, रक्तदात्यांचे सत्कार व कार्यशाळेचे यशस्वी आयोजन ! ; सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेच्या वतीने ‘जागतिक रक्तदाता’ दिन साजरा.

  • संजय पिळणकर 
    वेंगुर्ला : जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधुन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वेंगुर्ला येथे सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेच्या वतीने शनिवार दि. १४ जून २०२५ रोजी रक्तदान शिबीर, रक्तदात्यांचे सत्कार तसेच देहदान, अवयवदान व रक्तदानाबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन दीपप्रज्वलननाने वेंगुर्ला येथील समाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर यांच्या हस्ते, संस्थेचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, उपाध्यक्ष महेश राऊळ, प्राचार्य जगदीश गवस, संस्थेचे आयडॉल व सल्लागार सुधीर पराडकर, आनंद वेंगुर्लेकर, भाई देऊलकर, डॉ. संजीव लिंगवत, डॉ. ऐश्वर्या, विभागीय अध्यक्ष यशवंत गावडे, ऍलिस्टर ब्रिटो, अक्षय मयेकर, वैभव रेडकर, भूषण सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
  •    
    यावेळी डॉ. संजीव लिंगवत यांनी रक्तदानाबाबत उपस्थितांना शपथ दिली. तर प्रस्ताविकात संजय पिळणकर यांनी संस्थेच्या देदीप्यमान कार्याचा आढावा घेताना, ही जिल्ह्यातील अशी एकमेव संस्था आहे जी रक्तदान, अवयवदान व देहदान करण्यासाठी सतत जनजागृती व कार्यशाळा घेते. तसेच आजपर्यंत ५०० हून अधिक रक्तदान शिबीरे मित्रसस्थांच्या सहकार्याने घेतली आहेत. तसेच गोवा येथील बांबोळी हॉस्पिटलच्या ब्लड बँकेला आतापर्यंत एक हजारहून अधिक बॅगसचा पुरवठा करणारी ही एकमेव संस्था आहे. तसेच अवयवदान व देहदानाबाबत जनजागृती करून आतापर्यंत आयुष हॉस्पिटलला (धारगळ – गोवा) देह उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच थॅलेसेमिया या आजाराची या संस्थेने सद्यस्थितीत १७ मुलं दत्तक घेतली आहेत. त्यापैकी काही मुलांचा रक्तगट हा दुर्मिळ असून त्यांना वेळेवर रक्त पुरवठा करणारी ही जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे. तसेच बॉम्बे ब्लड ग्रुप या अति दुर्मिळ रक्तगटाचे आपल्या देशात २०० असून त्यापैकी २० जण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत, बॉम्बे ब्लड ग्रुपची शोधमोहिम राबविणारी ही एकमेव संस्था आहे. संस्थेच्या माध्यमातून नवीन बॉम्बे ब्लडग्रुप शोधले गेले आहेत. त्यापैकी तीन डोनर याच संस्थेने शोधले आहेत. या डोनरचे रक्त आंध्रप्रदेश, पुणे व सिंधुदुर्गात पुरविले आहे. त्यामुळे तो ही एक जगातील एखाद्या एनजीओ विक्रम असेल. तसेच दरवर्षी हजारो रुग्णांना तात्काळ रक्तदाते उपलब्ध करून देणे, प्लेटलेटस डोनरही सर्वाधिक याच संस्थेकडे आहेत.तसेच याच संस्थेने काही कार्यकर्ते घडविले आहेत जे नवीन संस्था काढून सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करत आहेत.
  • यावेळी सकाळी ९.३० ते १.०० या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात एकूण ३७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन शिबीर यशस्वी केले.
    यावेळी नियमित रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचविणाऱ्या रक्तदात्यांचे सन्मानही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला रक्तमित्र मोठ्या संख्येने सहभागी झाले.
    कार्यक्रमाला वेंगुर्ला कार्यकारीणीचे अध्यक्ष आबा चिपकर, उपाध्यक्ष राजेश पेडणेकर,उपाध्यक्ष सौ. समृद्धी पिळणकर, सचिव भूषण मांजरेकर, सहसचिव श्रीकृष्ण कोंडुस्कर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जोवेल डिसिल्व्हा, प्रास्ताविक व आभार संजय पिळणकर यांनी मानले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles