कणकवली : येथील विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत वाचन संस्कार विकसित करण्यासाठी किशोरवयीन मुलांच्या व्यक्तीमत्वाचा विकास होण्यासाठी ग्रंथ महत्वाची भूमिका पार पाडत असतात मूल्यसंस्कारांनी युक्त असलेले बालसाहित्य चैतन्य सृजन व सेवा संस्था संचलित मासिक ऋग्वेद चिल्ड्रन रिलीप फंडामार्फत विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेला बालसाहित्य सस्नेह भेट देवून बालकांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे यांनी वाचन चळवळ मुलांच्या रूजविकासाठी ग्रंथांचे महत्व सांगून मार्गदर्शन केले पर्यवेक्षक अच्युतराव वणवे, सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी, प्रशालेचे ग्रंथपाल महानंद पवार यांनी ऋग्वेद संस्थेचे आभार मानले.


