Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांचा अजितदादांच्या ‘राष्ट्रवादी’त प्रवेश!

सावंतवाडी : सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय येथे झालेल्या या प्रवेशावेळी श्री. वारंग यांना त्यांचा पक्षात योग्य मान सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही श्री. तटकरे यांनी दिली.

उमाकांत वारंग हे सावंतवाडी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष होते. तसेच ते सावंतवाडी सहकारी पतपेढीचे संचालक, सावंतवाडी अर्बन बँकेचे संचालक आयुर्वेद कॉलेज सावंतवाडीचे संचालक, तसेच कंझुमर सोसायटीचे संचालक म्हणून काम करत आहेत. सावतंवाडीमध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क असल्याने राष्ट्रवादीला त्यांच्या जनसंपर्काचा येत्या निवडणूकीत चांगला फायदा होणार आहे.

तसेच राष्ट्रवादी पश्नसंघटना वाढीसाठी त्यांची मदत होणार असून त्यांचा जिल्ह्यातील राष्ट्रवादीमध्ये योग्यप्रकारे सन्मान केला जाईल, याची ग्वाही जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी दिली.

मुंबईत झालेल्या या प्रवेशावेळी प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे, जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, युवक जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर, गणेश चौगुले, केदार खोत आदी उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles