कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेतर्फे कुडाळ येथील बैठकीचे अधीक्षक अभियंता यांच्या समक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध समस्या बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोडामार्ग तालुक्यातील विविध समस्या बाबत वीज ग्राहक संघटनेच्या वतीने विविध मागण्या व समस्या कथन करण्यात आल्या. यात दोडामार्ग वीज ग्राहक संघटना सचिव भूषण सावंत यांनी विविध मागण्या वीज विभागाकडे केल्या आहेत. त्यात प्राधान्याने इन्सुली – सासोली- दोडामार्ग पर्यंत अंडरग्राउंड विद्युत लाईन करण्यात यावी, महालक्ष्मी कंपनीकडून दोडामार्ग तालुक्याला सातत्याने विद्युत पुरवठा करण्यात यावा, भेडशी विभाग डोंगराळ व दुर्गम असल्याने सहाय्यक अभियंता नेमणूक व्हावी, दोडामार्ग कार्यालयात फॉर्मल टेक्निशियन वीज विभागात नियुक्त व्हावा, एनसीआरएमटी योजने अंतर्गत दोडामार्क शहरात अंडरग्राउंड विद्युत लाईन व्हावी, दोडामार्ग कार्यालयात कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता ही दोन्ही पदे भरण्यात यावी, विद्युत निरीक्षक सिंधुदुर्ग कार्यालयातून कंत्राटी कर्मचारी यांना सुरक्षा कीट व विमा पुरवण्यात यावा, तिलारी पुनर्वसन क्षेत्रात अनेक विद्युत खांब गंजलेले असून विद्युत वाहिन्या ही गंजलेले असून ते लाईन बदलण्यात यावी, वीज विभागात रिक्त पदे भरण्यात यावी, दोडामार्ग तालुक्यातील वीज बिल एजन्सी बदलण्यात यावी, आदी मागण्या सचिव भूषण सावंत यांनी वीज विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे केल्या आहेत.
इन्सुली ते दोडामार्गपर्यंत विद्युत लाईन अंडरग्राऊंड करावी ! : दोडामार्ग वीज संघटना सचिव भूषण सावंत यांची मागणी.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


