सावंतवाडी : तालुक्यातील माडखोल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक आज घेण्यात आली. पक्षीय धोरणानुसार माजी व्हाईस चेअरमन प्रकाश नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या पदावर भिकाजी जाधव यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी माजी सरपंच राजन राऊळ, बाळु शिरसाट, तसेच माजी व्हाईस चेअरमन प्रकाश नाईक, सोसायटी संचालक भाऊ कोळमेकर, सुरेश आडेलकर, जनार्दन लातये, नंदू दळवी, सौ. गोपिका राऊळ, सौ रंजिता चव्हाण, गट सचिव सौ. गौरी रेडकर, लिपीक नागेश मेस्त्री यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ही निवड प्रक्रिया अध्यासी अधिकारी सुजय कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.


