कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला व सिंधुदुर्ग क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यामंदिर प्रशालेत ऑलिम्पिक दिवस साजरा करण्यात आला . या क्रार्यकाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड व सौ शितल शिंदे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना सौ शिंदे मॅडम यांनी ऑलिम्पिक स्पर्धा आणि खेळाचे महत्व तसेच व्यक्तीमत्व जडण घडणीत राष्ट्राच्या विकासासाठी किती आवश्यक आहे या विषयी मार्गदर्शन केले.

राहुल गायकवाड यांनी ऑलिम्पिक खेळातील भारताचे स्थान आणि जीवनात खेळाचे महत्व अनेक उदाहरणांनी क्रीडा क्षेत्राचा इतिहास उलगडत ऑलिम्पिक स्पर्धेतून राष्ट्रा राष्ट्रातील संघर्ष कसा कमी होतो एकता आणि समानता यांचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे विश्व ऑलिम्पिक स्पर्धा या विषयी मार्गदर्शन करून महत्व विशद केले.
या कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. सौ. राजर्षी साळुंखे मॅडम उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत डॉ. सौ. राजर्षी साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ऑलिम्पिक आणि विद्यार्थी जीवन खेळांचे महत्व या विषयी माहिती सांगून शुभेच्छा दिल्या प्रशालेचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे पर्यवेक्षक अच्युतराव वणवे उपस्थित होते प्रास्ताविक व आभार क्रीडा शिक्षक श्री सुदिन पेडणेकर यांनी केले. यावेळी प्रशालेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .


