सावंतवाडी : येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या सेवेत असलेल्या सी. टी. स्कॅन मशीनचा पार्ट खराब झाल्यामुळे गेले दोन दिवसापासून सी. टी. स्कॅन सेवा बंद होती. वारंवार लाईट ये-जा करत असल्यामुळे सी.टी.स्कॅन मशीनचा पार्ट गेल्याची माहिती येथील सी.टी.स्कॅन ऑपरेटर यांनी दिली होती. परंतु आज रात्री नऊ वाजता मशीनची दुरुस्ती झाली असून आज रात्री 11 पासून सी.टी.स्कॅन मशीन रुग्णांच्या सेवेसाठी पूर्ववत करण्यात आल्याची माहिती येथील सी.टी.स्कॅन डिपार्टमेंट मॅनेजर प्रथमेश परब यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे व रुग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य रवी जाधव यांना दिली आहे.
Good News – सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सी. टी. स्कॅन मशीन दुरुस्त. ; आज रात्री ११ वाजल्यापासून रुग्णांच्या सेवेत पूर्ववत.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


