सावंतवाडी : येथील मुक्ताई अकॅडेमीने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॅरम आणि बुद्धिबळ कोचिंग वर्कशॉपचे आयोजन केले आहे. पुढील महिन्यात होणा-या शालेय स्पर्धेच्या आणि अकॅडेमीच्या स्पर्धेच्या तयारीसाठी हे वर्कशॉप घेण्यात येत आहे. सावंतवाडी येथील श्री.पंचम खेमराज महाविद्यालयाच्या हाॅलमध्ये रविवार दि. 29 जून रोजी सकाळी 09:30 ते दुपारी 01:30 या वेळेत वर्कशॉप घेण्यात येईल. कौस्तुभ पेडणेकर हे कॅरमचे आणि राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर हे बुद्धिबळचे कोचिंग करणार आहे.
नाव नोंदणीसाठी श्री. कौस्तुभ पेडणेकर यांच्या 8007382783 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करायचा आहे. सहभाग घेणा-या विदयार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल. जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी या वर्कशॉपमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन कौस्तुभ पेडणेकर यांनी केले आहे.
मुक्ताई अकॅडेमीकडून सावंतवाडीत मुला-मुलींसाठी २९ जून रोजी कॅरम, बुद्धिबळ कोचिंग वर्कशॉप!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


