सावंतवाडी : तालुक्यातील कलंबिस्त इंग्लिश स्कूलच्या शैक्षणिक वर्ष1999-2000 च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांकडून प्रशालेतील गरजू व होतकरु विद्यार्थांना सुमारे 24 डझन वहयांचे वाटप केले. वह्यांसाठी या बॅचमधील समीर धोंड, न्हानू धुरी, प्रसाद पवार, प्रवीण बांदेकर, ज्ञानेश्वर राऊळ, अशोक सावंत, सुशील पावसकर, संदीप राऊळ, विजया कुडतरकर, समिता नाईक, दिनेश राऊळ, रंजना तावडे, निलांगी पास्ते, शर्मिला पास्ते या माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक सहयोग दिला. माजी विद्यार्थी समीर धोंड व न्हानू धुरी यांनी प्रशालेत उपस्थित राहून या वह्यांचे वितरण केले.
समीर धोंड यांनी विद्यार्थ्यांनी आपली उत्तम शैक्षणिक प्रगती साधावी, समाजाचे, शाळेचे ऋण लक्षात ठेवून आपणही पुढे हा वारसा असाच चालू ठेवावा, असे आवाहन केले. मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी या माजी विद्यार्थ्यांचे शाळा व संस्थेच्या वतीने आभार मानले. यावेळी प्रशालेतील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


