Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

डॉ. सुधीर कुंभार लिखित ‘जटा मुक्ती’ या पुस्तकाचे लोकार्पण !

कराड : ‘जटा निर्मूलन’ या सामाजिक कार्याद्वारे जटाधारी महिलांच्या मनातील भीती व अंधश्रद्धा काढून त्यांची जटापासून मुक्तता करणे या उद्देशाने केलेले काम पुस्तक रूपाने प्रथमच मराठीतून आले आहे. जटा निर्मूलन कार्यात गेली तीस वर्षे जटा सोडविण्यावर भर देऊन जटाधारी व्यक्तीची मानसिक तयारी करण्याचे कार्य कसे केले. हे 130 महिलांच्या जटा सोडवून सत्यकथा द्वारे मांडणी डॉ. सुधीर कुंभार यांनी केली आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांनी ‘जटामुक्ती’ या पुस्तकाच्या लोकार्पण समारंभ वेळी व्यक्त केले .


डॉ. सुधीर कुंभार लिखित ‘जटा मुक्ती’ जटांच्या जोखडापासून मुक्ती या मनोविकास प्रकाशनाच्या पुस्तकाचे लोकार्पण एम. एन. रॉय संस्था, कराड आणि बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड यांच्या वतीने आयोजित संयुक्त कार्यक्रमात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक विचारवंत डॉ. राजेंद्र कुंभार होते. जटांच्यापासून होणारा त्रास कमी करून जटामुक्त स्त्रियांच्या जीवनात व कुटुंबात नवा प्रकाश आणण्याचे योगदान त्यांच्या टीमने केलेले आहे.जटाबाधित लोकांच्या पर्यंत हे काम पोहोचवण्यासाठी हे वैज्ञानिक व सामाजिक पुस्तक उपयुक्त ठरेल, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाची प्रस्तावना व स्वागत प्राचार्य सतीश घाटगे यांनी केले. दुसऱ्या पिढीतील कार्यकर्ते तयार करण्याचे काम या जटा निर्मूलन चळवळीतून झाल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी या पुस्तकावर विद्यालयीन स्तरावर वाचन व महाविद्यालयीन स्तरावर परिसंवाद आयोजन केला जाणार असल्याचे सांगितले.आभार श्री सुहास पाटील यांनी मानले.
जटामुक्ती पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यात अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातारा ,एन्व्हायरो फ्रेंड्स नेचर क्लब ,छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुप ,विद्योदय मुक्तांगण, विजय दिवस समारोह , तसेच सामाजिक चळवळीतील सातारा ,सांगली, कोल्हापूर येथून आलेले कार्यकर्ते, शिक्षक, लेखक, विद्यार्थी ,पत्रकार आले होते. यावेळी जटा निर्मूलन कार्यावरील फोटो आणि बातम्यांचे पोस्टर प्रदर्शन व पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्ताने जटाधारी व्यक्ती व कुटुंबापर्यंत जटामुक्ती करुन घेण्यासाठीचा संदेश पोहचवला
गेला.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles