Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी माडखोलची विद्यार्थिनी निकिता गवळी जिल्ह्यात अव्वल ! ; ८२.५०% गुणांसह चमकदार यश, डी. फार्मसी निकाल १००%.

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई तर्फे घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२५ मध्ये माडखोल येथील व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या पदविका (डी. फार्मसी) अभ्यासक्रमाचा निकाल 100% लागला आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कृष्ट कामगिरी करत उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
प्रथम वर्षाचा निकाल खालीलप्रमाणे –
प्रथम क्रमांक – कु. निकिता गवळी (८२.५०%)
द्वितीय क्रमांक – कु. सिद्धी गोसावी (८१. २०%)
त्रितिय क्रमांक – कु. प्राची हनपडे (८०.%)

द्वितीय वर्षाचा निकाल खालीलप्रमाणे-
प्रथम क्रमांक कु. संजना संजय मेस्त्री (८३. १८%)
द्वितीय क्रमांक कु. नेहा सुंदर गावकर (८३%), तर
तृतीय क्रमांक कु. प्रतिक्षा केशव शिंदे (८२.१८%) यांनी पटकावला असून विशेष बाब म्हणजे,
प्रथम वर्षाची विद्यार्थिनी कु.निकिता गवळी हिने (८२.५०%) गुण पटकावत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा मान उंचावला आहे.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे आधारस्तंभ व प्रेरणास्थान, माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटिल तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल पाटील यांनी अभिनंदन करत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. पंकज पाटील, प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विद्यार्थी, शिक्षकवर्ग व पालकांत आनंदाचे वातावरण आहे. या यशामुळे महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा जिल्ह्यात अधिकच मजबूत झाला आहे.
व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, मडखोलने आपल्या शैक्षणिक गुणवत्ता व शिस्तबद्धतेमुळे सावंतवाडी तालुक्यात आपले स्थान अधिकच बळकट केले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles