सावंतवाडी : येथील मिलाग्रीस हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शासनाच्या ‘एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योग’ या थीमवर आधारित योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. इयत्ता नववी ब ची विद्यार्थिनी कु. शमिका संजय शेवाळे हिने विद्यार्थी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर टीचर प्राजक्ता कांबळे यांनी शिक्षकी मनोगत सादर केले.सावंतवाडीतील सुप्रसिद्ध योग प्रशिक्षक अभिषेक नाईक सर (एम. एस्सी इन योगा)यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदाना यांनी सर्वांना शुभ संदेश दिला. प्रशालेचे पी टी ए मेंबर देखील उपस्थित होते. गणेश डिचोलकर यांनी सूत्रसंचालन तर सौ. रोझा फर्नांडिस यांनी आभार मानले. तसेच योग दिनाच्या निमित्ताने सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये डी. वाय.एस. पी. विनोद कांबळे सर व पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण सर यांनी आयोजित केलेल्या योग शिबिराला प्रशालेचे वीस विद्यार्थी व शिक्षक निलराज सावंत यांनी उपस्थिती दर्शवली होती.


