नाशिक : नाशिकचे ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे हे आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थिती सकाळी साडे अकरा वाजता ठाण्यात हा प्रवेश सोहळा होणार आहे. त्यांच्यासोबत ठाकरेंच्या सेनेचे 8 नगरसेवक, 4 माजी जिल्हा परिषद सदस्य देखील शिंदेंच्या सेनेत जाणार आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरेंच्या सनेला मोठं खिंडार पडलं आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह 8 माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील 2 माजी आमदार देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती विलास शिंदे यांनी दिली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पूर्वी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. सुधाकर बडगुजर यांच्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे देखील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाला लागली गळती अजूनही वाढली आहे.
ADVT –


