रत्नागिरी : येथील स.रा.देसाई डी. एल. एड. कॉलेजमध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला..
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यानी , सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सचि पाटील व कॉलेजचे नूतन प्राचार्य डॉ. विक्रांत रावराणे यांच्या मार्गदर्शनानुसार पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार व फुले अर्पण करत दिव प्रज्वलन करून अभिवादन केले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. विक्रांत रावराणे होते. मुलांनी आपआपली मनोगते व्यक्त केली. छत्रपती छाडू महाराजाच्या अतुलनी,भरीव , अविस्मरणीय सामाजिक , कामाचा आपल्या भाषणातून जागर केला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन साक्षी मांडवकर द्वितीय वर्षाची छात्राध्यापिका साक्षी मांडवकर हिने केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु . छात्राध्यापिका पूजा चुमक हिने केले .
सदर कार्यक्रमाच्या अध्यस्थानी असलेल्य स.रा.देसाई ,डी. एल. एड. कॉलेजचे नूतन प्राचार्य डॉ. विक्रांत रावराणे यांनी अध्यक्षीय मार्मिक भाषणात आपली राज सत्ता खऱ्या अर्थाने वंचित समाजासाठी वापरणारे आरक्षणाधिश” लोकराजा” दीन-दलित आणि शोषित वर्गाचे दुःख समजून राज्याची जुनी परंपरा संपुष्टात आणनारा लोकराजा, समता, बंधुता-,यांची शिकवण देणारे “दिन -दुबळ्या शोषिताचे तारणहार” महान समाज सेवक समाजसुधारक लोकूराजा “छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या व सामाजिक न्याय दिनाच्या सर्वांना शार्दिक शुभेच्छा दिल्या.


