सावंतवाडी : येथील यशश्री कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी क्लासचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. नंतर संचालक एल. पी. पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यानंतर इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य संपादन केलेल्या व इयत्ता 11वी मध्ये आर. पी. डी. ज्युनियर कॉलेज सावंतवाडी तसेच मिलाग्रीस शाळेमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. सत्काराचे स्वरूप ट्रॉफी, शाल, फाईल, गुलाबपुष्प व रोख रक्कम असे होते.

यावेळी 12 वी मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थांमध्ये –
1. कु.तनुज परब 95% सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय व सावंतवाडी तालुक्यात प्रथम (5001/-)
2. कु. कौस्तुभ सावंत 92.17% (1001/-)
3. कु. हर्ष चिंदरकर 91.63%
4. कु. सेजल सावंत 76% या चार विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तर 11वी मधून :
1. कु. दत्तराज पै 96.33%(1001/- )आर. पी. डी. मध्ये प्रथम
2. कु. चिन्मय असनकर 93.33% आर. पी. डी. मध्ये द्वितीय
3. कु. मोहन मालवणकर 86.17% आर. पी. डी. मध्ये तृतीय
4. कु. सानिका गांवकर 85% आर. पी. डी. मध्ये चतुर्थ
5. कु. अफाग नाईक मिलाग्रीस शाळेमध्ये प्रथम या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. य
नंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतातून श्री. पाटील सरांनी आपल्याला वर्षभर कसे मार्गदर्शन केले ते सांगितले. व आपण सरांचे अत्यंत ऋणी आहोत अशी भावना व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अदिती राजाध्यक्ष हिने केले.


