सत्यार्थ न्यूज ‘ चॅनेलच्या बातमीची तात्काळ दखल ! डेगवे मुख्य रस्त्यावरील झाड जागे झालेल्या प्रशासनाने आज हटविले.
बांदा : डेगवे थापेश्वर मंदिर परिसरात गेले ८ दिवस रस्त्यावर पडलेल्या झाडामुळे वाहन चालक कसरत करत वाहने चालवत होते.त्यातच एक तरुण अपघातामुळे जखमी झाला होता.
‘सत्यार्थ न्यूज ‘ चॅनेलच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाचे या बाबीकडे दुर्लक्ष होत असून संबंधित प्रशासन एखादा बळी जाण्याची वाट पाहत आहे काय ? असा सवाल केला होता.
सदर वृत्त प्रसिद्ध होताच निद्रीस्त असलेले प्रशासन खडबडून जागे झाले व बातमी प्रसिद्ध झाल्यापासून अवघ्या काही तासात सदर झाड दूर करून रस्ता मोकळा करण्यात आला.
दरम्यान, प्रशासनाच्या या कृतीबद्दल व सत्यार्थच्या सहकार्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


